मुद्दे : संतांच्या प्रभावळीतील एक संत नाव, गाव- बालपण, शिक्षण-संसारात विरक्ती- - समाजप्रबोधन, कीर्तन, प्रवचन- फाटकी गोधडी व गाडगे- नाव गाडगेबाबा कष्ट केल्याविना भाकरी स्वीकारत नसत स्वच्छता - चांगले अन्न इतरांना वाटून टाकत - समाजोपयोगी गोष्टी केल्या- कार्यरत असताना मृत्यू. ]

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंडित आहे. संत गाडगेबाबा हे या मालिकेतील एक महत्त्वाचे मौक्तिक अगदी मागासलेल्या घरात जन्मलेल्या, शिक्षणाचे विशेष संस्कार नसलेल्या या महात्म्याने एवढे अमूल्य विचार लोकांपुढे मांडले की आपला विश्वासच बसत नाही.

(२३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी एका परिटाच्या घरी गाडगेबाबांचा जन्म झाला होता. त्यांचे मूळ नाव होते डेबूजी. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्या घरात कायमचे दारिद्र्य होते. त्यात वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे हे मायलेकरू अनाथ झाले व छोटा डेबूजी आपल्या आईसह मामाकडे राहायला गेला)

(डेबू मामाकडे शेतात खूप कष्ट करत असे; पण या मामाच्या शेतावर सावकाराने जप्ती आणली. निरक्षरतेमुळे सावकाराने मामाला फसवले होते. हे डेबूने जाणले. त्यामुळे स्वतः शिकलेला नसतानाही त्याला शिक्षणाचे महत्त्व उमगले) आपले उर्वरित आयुष्य हे त्यांनी सामाजिक प्रबोधनासाठी वेचले. या प्रबोधनासाठी ते भजन, कीर्तन, प्रवचन हा मार्ग वापरत.

१९१२ रोजी त्यांचा विवाह झाला होता; परंतु ते संसारात कधी रमलेच नाही. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात गाडगे असे; म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज' किंवा 'गोधडे महाराज' म्हणत. ते कधीही एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट केल्याशिवाय कोणाकडून भिक्षाही स्वीकारत नसत.

त्यांच्याजवळ नेहमी झाडू असे आणि स्वतः झाडण्याचे काम करताना ते सर्वांना स्वच्छता राखण्याचा उपदेश करत. अगदी सामान्य लोकांच्या जीवनातील उदाहरणे घेऊन ते उपदेश करत. 'चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये' अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून करीत असत.

(स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते गरिबांना वाटून टाकत. त्यांना मिळालेल्या धनातून त्यांनी यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधल्या, लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले, नदीवर घाट देखील बांधले. अनेक ठिकाणी त्यांनी गोसंरक्षण संस्था उभारल्या. स्वतःसाठी त्यांनी कोणाकडून कधीही घेतले नाही या कधी कोणालाही शिष्य केले नाही. लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम करत असताना प्रवासातच अमरावतीजवळ १९५६ मध्ये त्यांचे देहावसान झाले. असा हा महान निरिच्छ सेवाभावी संत होता.)